मुक्ताईनगर। तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या 33 जागांसाठी पोटनिवडणुक घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व ग्रामपंचायतीमध्ये नवीन मतदार यांद्याचे वाचन करण्यात आले. प्रशासनातर्फे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीचा निवडणुक कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे.
त्यानुसार याठिकाणी 27 मे रोजी मतदान घेण्यात येईल अशी माहीती निवडणुक शाखेच्या सुत्रांनी दिली. 30 रोजी प्रसिध्द होणार निकाल येथील सदर पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रीया सुकळी, वायला, मुढोळदे, मेळसांगवे, पारंबी, चिचखेडा बुद्रुक, पंचाणे, हलखेडा पिंप्रीनांदु, उचंदा, वढवे, चिचखेडा खुर्द, राजुरा, लोहारखेडा, पिंप्राळा, नांदवेल, खामखेडा, कोर्हाळा बेलसवाडीच्यावर असलेल्या गावांसाठी पार पडणार आहे. त्यामुळे याव्यतिरिक्त असलेल्या जागा अनुसुचित-जमाती महीला व पूरुष वर्गासाठीच्या राखीव आहेत तर हलखेडा येथे नामप्र स्री व राजुर येथे नामप्र प्रवर्गातील नामनिर्दशन पत्र न मिळाल्याने त्या जागा आतापर्यत रिक्तच होत्या. निवडणुक कार्यक्रमात 5 ते 12 मे नामनिर्दशन पत्र दाखल करणे 15 मे रोजी अर्ज छाननी 17 रोजी नामनिर्दशनपत्र मागे घेणे 17 मे रिंगणांत असलेल्या उमेदवांराची यादी प्रसिध्द करणे, 27 मे रोजी मतदान 29 मे रोजी मतमोजणी व 30 मे रोजी निवडणुक निकाल प्रसिध्द करण्यात येईल अशी माहीती निवडणुक सुत्रांनी दिली.