मुक्ताईनगर- नगरपंचायतीद्वारा प्रभाग क्रमांक 12 मध्ये जेसीबीद्वारे नालेसफाईला सुरुवात करण्यात आली. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रभागातील मोठ-मोठे नाले घनकचर्याने तुडुंब भरले होते. नालेसफाईसाठी प्रभागाचे नगरसेवक संतोष मराठे यांनी पालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला त्यामुळे पालिकेने 12 सप्टेंबर रोजी जेसीबीद्वारा प्रभागातील नाले व गटारींची साफसफाई केली.
मुख्याधिकार्यांनी केली पाहणी
मुख्याधिकारी शाम गोसावी, नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनिषा पाटील, नगरसेवक संतोष मराठे, संतोष कोळी व नगरसेविका बिलकिसबी बागवान तसेच तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील, विनोद सोनवणे, माजी सरपंच प्रवीण पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील यांनी भेटी दिल्या व कामाची पाहणी केली. प्रभागातून जाणारा नाला हा शहरातील प्रत्येक भागातील गटारींचा स्त्रोत असल्याने व हे पाणी पूर्णा नदीत जात असल्याने येथे नगरोत्थान विभागातून मोठ्या नाल्यांचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठवून या नाल्याचा प्रश्न सोडवू, असे मुख्याधिकारी शाम गोसावी म्हणाले.