मुक्ताईनगर- मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली असून रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन सुरू आहे. प्रचारासाठी राजकीय पक्षांसह अपक्षांमध्ये ही उत्साह दिसून येत आहे. 17 प्रभागांसह एका लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपा एका बाजूला तर राकाँ व शिवसेना हे दोन पक्ष एकत्रीत आले तर काँग्रेसने वेगळी चूल मांडली आहे. यात पहिल्यांदाच भारीप बहुजन महासंघ ही निवडणूक रिगणात उतरली आहे. 4 व 5 रोजी भाजपातर्फे वॉर्ड क्रमांक सहा, आठ, तीन, 17, 9 अश्या विविध प्रभागात खासदार रक्षा खडसे यरंव्सर नेतृत्वाखाली तसेच भाजपाचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत प्रचार फेरी काढण्यात आली. भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार नजमा इरफान तडवी तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार रत्ना गजानन वंजारी (पढार), साधना हरिश्चंद्र ससाणे, नितीन मदनलाल जैन (बंटी), मुकेशचंद्र वानखेडे, बागवान बिलकीस बी.शेख आसीफ यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली व महिलांची बैठक घेण्यात आली.
शिवसेना-राकाँने काढली रॅली
शिवसेना व राकाँतर्फे ही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील तसेच राष्ट्रवादीचे ईश्वर रहाणे, यु.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या असलेले अधिकृत उमेदवार जोत्स्नाा दिलीप तायडे तर नगरसेवक पदाचे प्रभाग एकमधील उमेदवार प्रशांत टोंगे (गणेश), दोनमधील खान शगुप्तां बी.अफसर, तीनमधील राकाँच्या विजया दीपक नाईक, चारमधील शिवसेना उमेदवार शेक अफरोज बी.शब्बीर, पाचमधील हमीदा बी.गयास तसेच 12 मधील मध्ये संतोष सुपडू मराठे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली.
काँग्रेसचेही शक्तीप्रदर्शन
काँग्रेस पक्षातर्फे डॉ.जगदीश पाटील, तालुका अध्यक्ष आत्माराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या रॅली द्वारे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधुरी आत्माराम जाधव तर नगरसेवक पदाचे प्रभाग एकचे उमेदवार रवींद्र धनगर, प्रभाग दोनचे उमेदवार फकीर सलीमा बी.आलम शहा, तीनमधील पौर्णिमा पवन खुरपडे, चारमधील शेख शबाना आरीफ, पाचमधील आजाद तस्लिम कौसर मोहम्मद आसीफ, 13 मधील सरीता रवींद्र पाटील, 15 मधील बळीराम दौलत गवई ह्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.
भारीपाने केला प्रचार
भारीप बहुजन महासंघा तर्फे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनवणे, जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, समाधान गवई, विश्वनाथ मोरेख, संजय कांडेलकर यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार आशा देवेंद्र बोदडे, कुणाल गवई, संजय कांडेलकर, कौस्तुभ शिंदे यांच्या प्रचार सभा घेण्यात आल्या. सुरुवातीला प्रवर्तन चौकातील महापुरुष महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.