मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक : दुपारी एक वाजेपर्यंत 40 टक्के मतदान

0
मुक्ताईनगर : भाजपा नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीसाठी रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत 4० टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी तिरंगी तर नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 73 उमेदवार रिंगणात आहेत. एकनाथराव खडसे यांचा हा मतदार संघ असल्याने जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे. या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात शिवसेना- राष्ट्रवादी अशी आघाडी आहे.
एकूण 23 हजार 726 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत.  दरम्यान शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपा व  शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेऊन वाद मिटवला.