मंगळवारी धडकलेल्या आदेशाने राजकीय वर्तुळात खळबळ
मुक्ताईनगर- नव्यानेच स्थापन झालेल्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत बुधवार, 30 मे रोजी दुपारी 3 वाजता नगरविकास मंत्रालयात काढण्यात येणार असून त्या संदर्भात पत्र 29 मे रोजी नगरपंचायतीत धडकताच राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली. मुक्ताईनगर नवनिर्मित नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत 30 मे रोजी नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र नाशिक विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक उपसंचालक विजय कुलकर्णी यांनी पाठवल्याने शहर व तालुक्यात मोठी खळबळ उडाली. या आरक्षण सोडतीकरीता संबधित नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी 10 लोकप्रतिनिधींना सोडतीसाठी उपस्थित रहावे, असे कळवण्यात आले.