पोलिस निरीक्षक अशोक कडलगांची बदली ; चार पोलिस ठाण्यांच्या अधिकार्यांना नोटीसा
भुसावळ- अवैध धंदे सुरू असतानाही त्यावर आवर न घातल्याचा तसेच बेशिस्त वर्तनाचा ठपका ठेवत मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक कडलग यांची सुरक्षा शाखेत शुक्रवारी जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी बदली केली होती तर त्यांच्या जागी सुरक्षा शाखेचे निरीक्षक सुरेश तुकाराम शिंदे यांची नियुक्ती केली होती. शिंदे यांनी शुक्रवारी रात्री आपल्या पदाचा पदभार स्वीकारला तर कडलग यांनी शनिवारी आपल्या पदाचा पदभार घेतला आहे.
अवैध धंद्यावरील कारवाईमुळे कडलगांची बदली
अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या पथकाने 15 रोजी टाकलेल्या छाप्यात मुक्ताईनगरमध्ये अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून आले होते शिवाय कडलगयांच्यावर बेशिस्त वर्तनाचा ठपका ठेवत अवैध धंदे रोखण्यास अपयशी ठरल्याचा अहवाल उपअधीक्षकांनी सादर केल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी त्यांची तातडीने शुक्रवारी बदली केली होती. दरम्यान, धरणगाव, चोपडा, पारोळा येथील पोलिस निरीक्षकांसह सावदा येथील सहाय्यक निरीक्षकांना अवैध धंदे तातडीने बंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून त्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे तर त्यानंतरही कामकाजात सुधारणा न झाल्यास बदलीचा इशारा देण्यात आला आहे.