मुक्ताईनगर बसस्थानकातून महिलेची पोत लांबवली

0

मुक्ताईनगर- बसस्थानकावरून एसटी बसमध्ये चढतांना अज्ञात चोरट्याने वृद्धेच्या गळ्यातील 55 हजाराची सोन्याची पोत लांबविल्याची घटना 25 रोजी दुपारी 12 वाजता घडली. तालुक्यातील चिखली येथील 70 वर्षीय गुंफाबाई प्रभाकर कांडेलकर ह्या मंगळवारी मुक्ताईनगर बसस्थानकातून मुक्ताईनगर-जोंधनखेडा बसमध्ये चढत असतांना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 23 ग्रॅम वजनाची 55 हजारांची सोनसाकळी लांबविली. याप्रकरणी गुंफाबाई कांडेलकर यांचे फिर्यादिवरून पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला.