मुक्ताईनगर बाजार उपसमितीत तुरखरेदी प्रारंभ

0

मुक्ताईनगर। मुक्ताईनगरच्या बोदवड बाजार उपसमितीत जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत नाफेडमार्फत तुर खरेदी केंद्राला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील सहा ठिकाणी साठवण बंधारे, शेततळे व नाला खोलीकरणाच्या कामांची पाहणी करत तालुक्यात गाळमुक्त अभियानाची सुरुवात जलसंपदा मंत्री राम शिंदे यांनी केली. मंत्र्यासमवेत अधिकारी व भाजपा पदाधिकार्‍यांचा ताफा होता.

शेततळ्यांची करण्यात आली पाहणी
सर्वप्रथम चिखली गावात एक साठवण बंधारा व शिवप्रसाद गुप्ता यांच्या शेततळ्याची पाहणी केली. त्यानंतर पिंप्रीअकराऊत येथे पाझर तलावात गाळमुक्त अभियानाचा शुभारंभ त्यांनी केला. तसेच तलाव दुरुस्तीची पाहणी केली. तेथून सातोड शिवारात नाला खोलीकरणाच्या कामांची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर माळेगाव, वनहद्दीतील सिमेंट बंधार्‍याची पाहणी करत आतील नाला बंधार्‍याची देखील माहिती त्यांनी अधिकार्‍यांकडून घेतली. सर्वात शेवटी पिंप्रीपंचम येथील वनविभागाच्या बंधार्‍यात गाळमुक्त व गाळयुक्त अशा अभियानाचा शुभारंभ त्यांनी केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अतिरीक्त मुख्य कार्यअधिकारी म्हसकर, जिल्हा बँक अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे- खेवलकर, जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे, रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आर.के नाईक, तहसिलदार जितेंद्र कुंवर, प्रांताधिकारी विजय भांगरे, गटविकास अधिकारी संजय बैरागी, तालुका कृषी अधिकारी विनायक व्यवहारे, या अधिकार्‍यांसमवेत बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, सभापती शुभांगी भोलाणे, दशरथ कांडेलकर, सुवर्णा साळुंखे, योगेश कोलते, जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदवडे, वैशाली तायडे, निलेश पाटील, माजी सभापती राजेंद्र माळी, कैलास पाटील, धर्मेंद्र