मुक्ताईनगर- मुक्ताईनगर-पाथर्डी मार्गे भुसावळकडे जाणार्या फैजपूर येथील स्वरांजली डीजे गाडीला मलकापूरकडून भुसावळकडे जाणार्या ट्रकने दिलेल्या धडकेत दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कोथळी बायपासजवळ घडली. या अपघातात डीजे वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
डीजे वाहनाचा पूर्णपणे चुराडा
मुक्ताईनगर शहरातून कोथळी गाव मार्गावरील फैजपूर येथील स्वरांजली मेलोडी डीजे वाहन (एम.एच.19 एस.1087) फैजपूरकडे जात असताना मलकापूरकडून भुसावळकडे जाणारा मालट्रक (क्रमांक डब्ल्यूबी 23 ए.2186) या गाडीने समोरून धडक दिल्याने डीजे वाहन चालक बंडू रमेश मेढे व बाळू वाघ हे दोघे जण गंभीर जखमी झाले. धडक इतकी जोरदार होती की, डीजे वाहनाच्या पुढील भागाचे पूर्णपणे नुकसान झाले.