मुक्ताईनगर मतदारसंघातील पुनर्वसनाचे प्रश्न महिन्यात मार्गी न लागल्यास आमदारकीचा राजीनामा देणार — आमदार चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर प्रतिनिधी……..… मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर मुक्ताईनगर तालुका तापी नदीकाठी व पूर्णा नदी काठी असलेल्या गावांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे ते जनतेचे प्रश्न व

जनतेच्या समस्या मार्गे लागल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही जर हे प्रश्न महिन्याभरात मार्गी लागले नाहीत तर मी आमदारकीचा राजीनामा देईल असे वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात २७ सप्टेंबर रोजी पुनर्वसन आढावा बैठकीचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, पाटबंधारे अधिकारी संदीप भदाणे, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, नायब तहसीलदार संदीप माकोडे, मुख्याधिकारी गजानन तायडे, स्विय सहाय्यक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

@@. प्रशासकीय प्रस्ताव ई ऑफिसच्या माध्यमातून शासनाकडे पाठवू … जिल्हाधिकारी आयुष प्रसाद .

याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी पुनर्वसन कामांमध्ये निधी प्राप्त नसेल किंवा आधीचे प्रस्ताव नवीन डी एस आर नुसार करून तसेच नवीन प्रस्ताव डी एस आर नुसार पालकमंत्री , ग्राम विकास मंत्री , पुनर्वसन मंत्री , आमदार यांना माझे सहीने पत्र पाठवा तसेच तयार झालेले नवीन डी एस आर नुसार चे पत्र राज्यस्तरावर 12 ऑक्टोंबर पर्यंत पाठविण्याचे सूचना जिल्हाधिकारी यांनी केली यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये हे जुने व नवीन प्रस्ताव डी एस आर नुसार घेता येतील व मुक्ताईनगर मतदारसंघातील रखडलेले पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागतील यासाठी पुनर्रचनांचे प्रश्नांना प्राधान्य द्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांना केल्या.

मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील तापी पूर्णा नदीच्या पात्रामुळे तसेच बॅक वॉटर च्या पाण्यामुळे बाधित झालेल्या व भविष्यात बाधित होणाऱ्या शेतकरी व नागरिकांच्या समस्या समस्यांबाबत सत्य अहवाल तात्काळ शासन दरबारी पाठवून शेतकरी व नागरिक यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहील असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

पुनर्वसनाच्या कामासाठी पाटबंधारे विभागाला निधी कमी पडत असेल तर डीपीसी मधून निधी देण्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

@@ मुक्ताईनगरतील जुने गाव ठाण्यातील रखडलेल्या 4 13 घरांचे पुनर्वसन , तसेच तिसरा टप्प्यात राहिलेल्या 22 घरांचे पुनर्वसन तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावाचे पुनर्वसन झाले होते त्यांना वाढीव मोबदला अजून मिळालेला नाही तो मिळावा. येत्या आठ दिवसात मंत्रालयामध्ये पुनर्वसन मंत्री ,पालकमंत्री ,ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे समवेत बैठक घेणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत सांगितले.

 

 

 

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील अंतुर्ली पातोंडी नरवेल भोकरी धामणदे घोडसगाव मेळसांगवे पंचाणे मुंढोळदे धामणगाव सालबर्डी कोथळी खामखेडा बेलसवाडी पूर्णाड तसेच रावेर तालुक्यातील सुलवाडी ऐनपुर आंदलवाडी भांबलवाडी अशा गावांना तापी व पूर्णा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे दरवर्षी नुकसान सहन करावे लागते इतकेच नव्हे तर जीवित हानी सुद्धा होत असते. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत त्यासाठी शासनातर्फे तात्काळ प्रयत्न व्हावेत गेल्या दोन-तीन वर्षात खऱ्या अर्थाने शासन गतिमान झाल्याचे अनुभवास येत असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवले त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नही तात्काळच मार्गे लागेल आणि सदरचा प्रश्न जर महिन्याभरात मार्गी लागला नाही तर मी आमदारकीचा राजीनामा देईल असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत वक्तव्य केले.

 

 

@@@ आमदार खडसेंचे नाव न घेता आमदार पाटील यांचा टोला..

शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही त्या संदर्भात तो पिकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आता पूर्तता होणार असून सदरची रक्कम विमा कंपनीच्या खात्यात शासनातर्फे पाठविण्यात आली असून ती लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार असल्याचेही आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सदरचा जीआर वाचून दाखवत सांगितले. विरोधक यांनी गेल्या काही दिवसांमध्ये उठवलेल्या प्रश्नांना पूर्णविराम दिला.

 

 

 

@@@ खासदारांच्या रूर्बन क्लस्टरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट… जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खासदार रक्षा खडसे यांच्यासह भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी शिवारातील रूर्बन क्लस्टरला बुधवारी सकाळी नऊ वाजता भेट दिली. येथे दररोज 40 टनांहून अधिक केळीपासून चिप्स तयार करण्यासाठी कारखाना कार्यान्वित करण्यासाठी विविध योजना आणि पी एम एफ एम इ अंतर्गत बँक कर्जांचे अभिसरण यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यामुळे बचत गटांमध्ये महिलांसाठी नोकऱ्या निर्माण होतील आणि परिसरातील शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल. यावेळी तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, सरपंच तुषार राणे व अधिकारी उपस्थित होते.