मुक्ताईनगर येथील दिनेश कदम यांना मराठा भूषण पुरस्काराने केले सन्मानित 

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..

 

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता।

शाहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥

 

मध्यप्रदेश प्रांतांत मराठा सेवा संघ ही संकल्पना सन 1998 मध्ये रुजविणारे व जन सामान्य माणसापर्यंत संघटनेचे काम नेणार व्यक्तिमत्व, समाजाचे काही तरी देणं लागतो, या विचारांनी प्रेरित होऊन समाज कार्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथील दिनेश शंकरराव कदम यांच्या सेवा रुपी कार्याची दखल घेत मराठा सेवा संघ प्रणित मराठा वस्तीगृह कक्ष व तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांचे वडील श्रीमंत राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ९ वे वंशज अशोक महाराज मोरे यांच्या शुभ हस्ते मराठा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, उद्योजक श्रीराम पाटील , सुनील महाजन तसेच दिनेश कदम यांचे कुटुंबीय आणि मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.