मुक्ताईनगर (प्रतिनिधी)…... मुक्ताईनगर सुन्नी मनियार मस्जिद ट्रस्ट तर्फे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना निवेदन देण्यात आले.त्यात म्हटले आहे की, मुक्ताईनगर शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक वर्षानुवर्ष एकता बंधुता सामाजिक सलोख्याने गुण्या गोविंदाने एकत्र राहतात.मुक्ताईनगर शहरात सणासुदीला धार्मिक कारणाने व कोणत्याही प्रकारचे वाद-विवाद किंवा अप्रिय घटना घडलेली नाही. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र तन-मन-धनाने सहभागी होऊन सन साजरे करतात हीच परंपरा कायम राखता या वर्षी हिंदू धर्मियांचा प्रमुख अनंत चतुर्दशी अर्थात गणपती विसर्जन आणि मुस्लीम बांधवांचा ईद- ए-मिलाद अर्थात(मोहम्मद पैगंबर जंयती) हे दोन्ही उत्सव २८ सप्टेंबरला एकाच दिवशी आल्याने मुक्ताईनगर शहराची सामाजिक शांतता अबाधित राहावी. दोन्ही धर्मातील ‘भाईचारा टिकून राहावा, यासाठी मुक्ताईनगर येथील मुस्लीम बांधवांनी गणेश विसर्जनानंतर २९ सप्टेंबर गुरुवार रोजी ईद-ए-मिलादचा जुलूस(मिरवणुक) काढण्याचा निर्णय घेतला आहे. असे निवेदन देताना सुन्नी मनियार मस्जिद ट्रस्ट चे मुतवल्ली कलीम हाजी रसुल मनियार, हकिम आर चौधरी(जिल्हा उपाध्यक्ष मुस्लिम मनियार बिरादरी) , शेख अहमद शेख यासीन,शेख मुशीर मनियार,आसिफ पेन्टर,रिजवान चौधरी,यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.