मुक्ताईनगर येथील युवकाचा शॉक लागून मृत्यू

0

मुक्ताईनगर- शहरातील मुस्लिम परीसरातील शेख इमरान गयास शेख (34) या युवकाचा विजेचा तारांचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी नऊ वाजता शहरातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये घडली. हयात शेख यांच्या खबरीनुसार मुक्ताईनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. इम्रानच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणावर जमाव जमला. अतिशय गरीब व भंगार व्यवसाय करून उदरनिर्वाह करणार्‍या इम्रानच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.