मुक्ताईनगर येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

0

मुक्ताईनगर । घरगुती भांडणाचे कारणावरुन येथील गायत्रीनगर परिसरात 28 वर्षीय मजुरी करणार्‍या युवकाने राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 24 रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील नरवेल येथील रहिवासी असलेले व हल्ली मुक्ताईनगर येथील गायत्रीनगरात राहणारे चेतन भागवत कोळी (वय-28) याने घरगुती भांडणाचे कारणावरुन दारु पिऊन पत्नीस तू नोकरी सोडून दे नाहीतर आत्महत्या करीन असा दम देवून 24 रोजी दुपारी घरात कुणीही नसाताना चेतन कोळी याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयताची पत्नी प्रतिभा कोळी यांच्या खबरीवरुन पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार किरण शिंपी करीत आहे.