मुक्ताईनगर येथे खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत, केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनांची आढावा बैठक संपन्न.
प्रतिनिधी मुक्ताईनगर….
मुक्ताईनगर तहसिल कार्यालय येथे खासदार रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनांची आढावा बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजना, तसेच राज्य सरकार पुरस्कृत आवास योजना व इतर योजनांचा आढावा घेण्यात येऊन संबंधित कर्मचाऱ्यांना योग्यता सूचना खासदार खडसे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह मुक्ताईनगर विधानसभा निवडणुक प्रमुख .अशोक कांडेलकर, जिल्हा उपाध्यक्ष .डी.एस.चव्हाण सर, .संतोष खोरखेडे, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख .ललित महाजन, नगराध्यक्षा.नजमा तडवी, तालुकाध्यक्ष .प्रफुल्ल जवरे, तालुका सरचिटणीस .चंद्रकांत भोलाणे, .विनोद पाटील, शहराध्यक्ष .पंकज कोळी, माजी पं.स.सदस्य .राजेंद्र सवळे, .गुणवंत पिवटे, .निखिल भोलाणकर, .संतोष झनके, वढोदा सरपंच.स्वप्ना खिरोळकर, गटविकास अधिकारी निशा जाधव, पं.स.विस्तार अधिकारी वाय आर अडागळे तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील संबधित योजनांचे शासकीय व निमशासकीय कर्मचारी उपस्थित होते.