मुक्ताईनगर येथे तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ

0

मुक्ताईनगर। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडद्वारे तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाने, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, स्वीय सहायक योगेश कोलते, बोदवड तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, जिल्हा परिषद सदस्य वैशाली तायडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य सुवर्णा प्रदीप साळुंखे, जिल्हा परिषद सदस्या वनिता गवळे, जिल्हा परिषद सदस्य निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे, पंचायत समिती सदस्य प्रल्हाद जंगले, बाजार समिती संचालक कैलास पाटील, अनिल वराडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.