मुक्ताईनगर येथे पॉवर लिलिफ्टींग व बेंचप्रेस अजिंक्यपद स्पर्धेस सुरुवात

0

मुक्ताईनगर : महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टींग असोसिएशन व जळगाव जिल्हा पॉवर लिफ्टींग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. निखिल खडसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 17 ते 19 डिसेंबर दरम्यान जी.जी. खडसे महाविद्यालयात पॉवर लिफ्टींग व बेंचप्रेस अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन न.ह. राका हायस्कुलचे अध्यक्ष मिठुलाल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी योगेश कोलते, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार एकनाथराव खडसे, पॉवर लिफ्टींग असोसिएशन अध्यक्ष मधुकर दरेकर, सहचिटणीस संजीवन भास्करन, अर्जुन पुरस्कारप्राप्त संजय सरदेसाई, सभापती राजेंद्र माळी, मधुकर पाटणकर, जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एस.डी. भिरुड, तहसिलदार जितेंद्र कुवर, खडसे महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.आर. पाटील, माजी सरपंच पुरुषोत्तम महाजन, नारायण चौधरी, प्रकाशचंद गुप्ता, आसाराम जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदिप साखरे यांनी केले. यशस्वीतेसाठी संजय निकम, संजीव वाढे, विजय लोंढे, एस.आर. महाजन, चव्हाण, येवले, डी.एम. फेगडे, के.एन. पाटील, एस.एस. गायकवाड, प्रा.डॉ. विरेंद्र जाधव, शाम मराठे, यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन रेशवाल यांनी केले तर आभार संजय निकम यांनी मानले.