मुक्ताईनगर येथे भव्य कावड यात्रा संपन्न हजारो भाविकांनी घेतला सहभाग.

मुक्ताईनगर प्रतिनिधी …. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी अधिक मास निमित्त तालुका सनातन हिंदू समाज च्या वतीने आज कावड कावड यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. कोथळी येथून या कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम कोथळी गावातही शोभायात्रा फिरवण्यात आली. त्यानंतर मुक्ताईनगर शहरात दाखल झाली कावड यात्रेदरम्यान भोले शंकर महाकाल यांच्या भव्यप्रतिमा सहित प्रभू श्रीराम,सीता तसेच लक्ष्मण व बजरंग बली यांच्या भव्य प्रतिमांची शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी कावड उचलण्यासाठी एकाच वेळी किमान 50 ते 60 तरुणांची गरज भासत होती. त्यानुसार गरजेनुसार तरुण हे कावड उचलण्यासाठी व आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आले. मुक्ताईनगर शहरात दाखल झाल्यानंतर प्रवर्तन चौक ते बोदवड चौफुली व बोदवड चौफुली वरून परत नागेश्वर मंदिराकडे या कावड यात्रेची यात्रा येऊन तिची समाप्ती झाली. याप्रसंगी संपूर्ण शहरातील सर्व धर्मीय नागरिक महिला युवक तसेच लहान भाविक देखील उपस्थित होते. जागोजागी कावड यात्रा थांबवून तिचे पूजन करण्यात येत होते. यात्रेच्या सुरुवातीला डीजेच्या तालावर भगवा झेंडा नाचवला जात होता तर मध्यभागी ढोल ताशांच्या गजरात तरुणांनी ठेका धरला होता शेवटच्या टप्प्यात मात्र भोले शंकर व इतर सर्व भगवंतांच्या प्रतिमा यांना कावड वर विराजमान करून खांद्यावरून कावड यात्रा पुढे नेली गेली व शेवटी बजरंग बली यांची प्रतिमा होती.