मुक्ताईनगर । येथील पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या भाजपच्या सदस्यांनी गट स्थापन केला असून गटनेतेपदी सुवर्णा साळुंके यांची निवड करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जावून अधिकृतरित्या गटाची नोंदणी करण्यात आली आहे. आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे शुक्रवार 10 रोजी सर्व सदस्यांची गट नोंदणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
पंचायत समितीच्या गटनेतेपदी सुवर्णा प्रदीप साळुंके यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, अमित चौधरी, चंद्रकांत भोलाणे, तालुका चिटणीस कैलास कोळी, विनोद पाटील यांसह सर्व सदस्य उपस्थित होते.