मुक्ताईनगर येथे रोहिणी खडसे यांच्या संकल्पनेतून स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिर संपन्न
शिबिरात 800 युवतींनी गिरवले स्व संरक्षणाचे धडे
मुक्ताईनगर प्रतिनिधी – राज्यात देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत,महिलांना एकट्यात गाठून विकृत ,मानसिकतेचे लोक महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात
अशावेळी महिलांना आपले रक्षण करण्यासाठी प्रत्येक वेळी कोणी मदतीला येईलच असे नाही त्यासाठी प्रत्येक महिलेने स्व संरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा होणे गरजेचे आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या तर्फे मुक्ताईनगर येथे स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
माजी महसूल मंत्री आ एकनाथराव खडसे यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावत्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पुजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले
याप्रसंगी मुक्ताई सह सुतगिरणी अध्यक्षा रोहिणी खडसे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश चिटणीस अँड अरविंद गोसावी, प्राचार्य आर पि पाटील, जे जे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
शिबिरात 800 महीला युवतींनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले
प्रशिक्षणार्थी युवतींना
गोपाळ जोनवाल, राजेंद्र जंजाळ श्रीमती प्रेम लता जोनवाल वैष्णवी चौधरी ,कोटीच्या नेमाडे ,
प्रथमेश चव्हाण , प्राजक्ता सोनवणे यांनी स्व संरक्षणाचे प्रशिक्षण दिले
सहभागी प्रशिक्षणार्थी युवतींना सहभागा बद्दल प्रमाणपत्र देण्यात आले
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या स्त्री ही संपूर्ण जीवसृष्टीच्या निर्मिती व संगोपनात नेहमीच मोलाचा वाटा उचलत आलेली आहे. भारतीय संस्कृती, समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, नागरी व्यवस्था, अर्थव्यवस्था, तथा भारतीयांच्या जीवनात तिने नेहमीच अतुलनीय भूमिका बजावली आहे. एका जिवाच्या निर्मितीपासून ते अंतापर्यंत ती सातत्याने वेगवेगळ्या भूमिकांमधून आपले योगदान सक्षमपणे देत असते. परंतु बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत आज तिच्या सुरक्षितते बाबत काही गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. दैनंदिन जीवनात आपल्या माता-भगिनींना अचानकपणे उद्भवणाऱ्या परिस्थितीला तसेच सामाजिक विकृतींना सामोरे जाणे करिता सक्षम बनवणे हाच सर्वोत्तम पर्याय आजच्या घडीला दिसतो. अनपेक्षित निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्याकरिता व निर्माण होणाऱ्या प्रसंगाला निर्भीडपणे तोंड देण्याची क्षमता निर्माण होण्याकरिता स्वसंरक्षणाचे काही धडे शिकणे हे युवतींकरिता अत्यावश्यक झाले आहे.याच उद्देशाने प्रेरित होऊन युवतींकरिता एक दिवसीय स्वयंसिद्धा स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले युवती महिलांनी उस्फूर्तपणे
शिबिरात सहभागी होऊन स्व रक्षणाचे धडे आत्मसात केले याचा त्यांना निश्चितच फायदा होईल भविष्यात मतदासंघांतील सर्व शाळा कॉलेज मध्ये शिबिर आयोजित करण्याचा मानस असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ एकनाथराव खडसे म्हणाले महीला युवतींनी सर्वोतोपरी स्वावलंबी व्हावे त्यांनी स्व संरक्षणाचे धडे घेऊन स्वतःचे रक्षण करावे या उद्देशाने रोहिणी ताई खडसे यांनी आयोजित केलेले स्वयंसिद्धा शिबिर हा कौतुकास्पद उपक्रम आहे
महिला या सर्व क्षेत्रात स्वयंसिद्ध झाल्या असुन स्व रक्षणात सुध्दा मागे राहू नये असे त्यांनी उपस्थित युवतींना आवाहन केले