मुक्ताईनगर येथे सीएमव्ही संदर्भात बैठक संपन्न नाशिकच्या पथकासोबत आमदार चंद्रकांत पाटील यांची बैठक तातडीने उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना

मुक्ताईनगर प्रतिनिधी……

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये सीएमवी या आजारामुळे केळी उत्पादक शेतकरी अतिशय त्रस्त झालेले असून शेकडो हेक्टर शेत जमिनीवर केळीचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सदर गंभीर परिस्थिती पाहता आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज मुक्ताईनगर येथे नाशिक येथील पथकासोबत बैठक घेतली.

याप्रसंगी केंद्रीय एकात्मिक केळी व्यवस्थापन विभाग नाशिकचे सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी विशाल काशीद, अमित जाधव, कृषी सहाय्यक संदीप पाटील,किरण महाजन हे उपस्थित होते.

मुक्ताईनगर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शेतकऱ्यांना सीएमवी आजारामुळे अक्षरशः केळी उपटून फेकावी लागत आहे. व दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान त्यांचे होत असून कर्जबाजारी होण्याचे प्रकार केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये वाढलेले आहेत. त्यावरून आमदार चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ या विषयावर संशोधन करून कायमस्वरूपी हा रोग कसा नष्ट करता येईल यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान बिजवाई आणि रोपे तयार करणाऱ्या कंपन्यांची चौकशी देखील करून त्यांच्यावर देखील सरसकट कारवाई करण्याचे आमदार पाटील यांनी पथकाला सुचवले. टिशू ची रोपे देखील सीएमव्हीग्रस्त असून आरू बीजवाई ही मुळापासूनच वाढत नाही किंवा निमुळती पाने येतात. वनस्पती विभागाने कायमस्वरूपी हा व्हायरस नष्ट व्हावा म्हणून लॅब मध्ये संशोधन करणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी सुचवलेल्या उपाययोजना करून देखील पुन्हा केळीवर सीएम रोग हा वाढतच आहे याबद्दल चिंता व्यक्त केली.

याप्रसंगी वनस्पती संरक्षण अधिकारी काशीद यांनी देखील या संदर्भात संशोधना चा प्रयत्न सुरू असून शेतकऱ्यांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन केले दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात कायमस्वरूपी योजना करण्यात यावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे हा प्रश्न मांडणार असल्याचे देखील सांगितले.