मुक्ताईनगर शहरवासीयांना पाणीटंचाईचे चटके

0

लोकप्रतिनिधींबाबत नाराजी, नियोजनाचा अभाव ; कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनेची मागणी

मुक्ताईनगर- हतनूरमधील बॅकवॉटरचे पाणी मुक्ताईनगर शहरापर्यंत असून केवळ लोकप्रतिनिधींच्या नियोजनाअभावी मुक्ताईनगर शहरवासीयांना तिव्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. पाण्यासाठी नागरीकांवर भटकंतीची वेळ आली आहे. यामूळे शहरवासीयांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे.

वारंवार खंडीत होतो शहरातील पाणीपुरवठा
मुक्ताईनगर शहरालगत असलेल्या पुर्णा नदी पात्रात हतनुर जलाशयातील बॅकवॉटरचे नियमीत पाणी असते.यामूळे शहरवासीयांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होणे अपेक्षीत आहे.मात्र लोकप्रतिनिधींच्या नियोजनाअभावी शहरवासीयांना वारंवार पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागते.यामध्ये नदीला पुर येणे,पाणीपुरवठ्यावरील विज पंप नादुरूस्त होणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यामूळे लोकप्रतिनिधींनी या समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना करणे अपेक्षीत आहे.सद्यस्थितीतही शहरात गेल्या पाच सहा दिवसापासुन पाणीपुरवठा ठप्प झाल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे.यामूळे शहरवासीयांची अवस्था नदी उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहे.यामूळे प्रशासनाने जातीयतेने लक्ष घालून मुक्ताईनगरातील पाण्याच्या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.