मुक्ताईनगर : शहरात 24 तासांच्या अंतराने चोरट्यांनी दोन दुचाकी चोरीला गेल्याने दुचाकी मालकांमध्ये भीती पसरली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
अशोक रामा सरोदे (53, रुईखेडा, ता.मुक्ताईनगर) यांच्या भावाच्या मालकिची दुचाकी (एम.एच.04 सी.वाय.1308) ही 24 जुलै रोजी अमर डेअरीजवळील टॉवरी मेडिकलसमोर लावल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी संधी साधून दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. दुसर्या घटनेत चांगदेव शिवारातील शेत गट क्रमांक 240 च्या बांधावरून चोरट्यांनी निवृत्ती माणिक कोळी (29, हतनूर, ता.भुसावळ) या शेतकर्याची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 सी.ए.5412) ही 23 रोजी दुपारी 12 ते दोन वाजेदरम्यान चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी कोळी यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार महंमद अमीर तडवी व हवालदार अशोक जाधव करीत आहेत.