मुक्ताईनगर । शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी मधमाशांनी केलेल्या अचानक हल्ल्यात 15 जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार 10 रोजी घडली. जखमींवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
येथील आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल परिसरात सकाळी 10.15 वाजता मधमाशांचा पोळ उठून विद्यार्थ्यांसह नागरिकांना चावा घेतला. तर भुसावळ रस्त्यावरील स्त्रीरोगतज्ञ डॉ. जैस्वाल यांच्या रुग्णालयाजवळ देखील दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास मधमाशांनी हल्ला करुन रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आलेल्या 10 गरोदर महिलांसह काही पुरुषांना देखील मधमाशांनी चावा घेतला. यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. यात संतोष मराठे हे रुग्णालयाखाली असलेल्या आयसीआयसीआय बँकेत आले असताना मधमाशांनी अचानक हल्ला केला त्यात मराठे यांच्या चेहर्यावर मधमाशांनी हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. तर शोभा अशोक शिंदे तसेच अन्य महिला देखील जखमी झाली. यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.