मुक्ताई कृषी महोत्सवात दुधाळ गायी म्हशींचे प्रदर्शन

0

मुक्ताईनगर । 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान होणार्‍या राज्यस्तरीय मुक्ताई कृषी महोत्सवात उत्कृष्ट जातीवंत देशी विदेशी संकरीत दुधाळ गायी, म्हशींचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर प्रदर्शन 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सुरु होणा असल्याची माहिती संवेदना फाऊंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर यांनी दिली. उत्कृष्ट गायी, म्हशी, शेळी, बोकड, वळु व पोल्ट्री अशा चार विभागात केली जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी दिली.

सहा गट याप्रमाणे करण्यात आले

यात म्हैस गट – मेहसाना, जाफर, मुर्‍हा, सुरती, गाय गट – गिर, सहीवाद, देशी, विदेशी गाय गट – एचएफ गाय, जर्सी गाय, जातीवंत वळू – उत्कृष्ट, शेळी, बोकड गट, पोल्ट्री- असील, देशी, आदी असे एकूण सहा गट करण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट बैलजोडीची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, खिल्लारी, विदेशी, निमार, नागोरी, अशा बैलजोडी स्पर्धेला अपेक्षित आहे. सर्व गटांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय जनावरे यांना आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी जनावरांची निवड महाराष्ट्र राज्य पशु संवर्धन विभागातर्फे केली जाणार आहे. स्पर्धेत सहभागाकरिता डॉ. डी.बी. चव्हाण, पशुधन विकास अधिकारी, मुक्ताईनगर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.