मुक्ताईनगर । मुक्ताई ते पंढरपूर या आषाढी एकादशी पायीवारीला 30 मे पासून सुरूवात होत आहे. 1 जुलैला पायीवारी पंढपुरात पोहोचणार आहे. पालखी सोहळ्याला मंगळवार 30 रोजी सकाळी 10 वाजता मुक्ताईनगर येथून सुरूवात होईल. तर पहिला मुक्काम सातोडला होणार आहे.
31 मे रोजी विसावाचा रूईखेड येथे आहे. 1 जूनला मलकापूर, 2 जून दाताळा, 3 जून तालखेड, 4 जूनला तांदूलवाडी, 5 जून राजूर, 6 जूनला बुलडाण्यातून पालखीचे प्रस्थान होईल. 7 जूनला चिखली, 8 जून खंडाळा, 9 जूनला मेरा बुद्रूक, 10 जून अंत्रीखेडेकर, 11 जूनला पिंपरी आंधळे, 12 जूनला टाकरखेड, 13 जूनला कन्हैयानगर जालना, 14 जूनला गोरक्षण जालना, 15 जूनला शेवगाव पाटी, 16 जूनला दाढेगाव 17 जूनला गुंदेवाडी, 18 जूनला गेवराई, 19 जूनला दुपार नामलगाव फाटा, 20 जूनला मुक्काम बिड माळी, 21 जूनला पेठ बिड बालाजी मंदिर, 22 जून अहीर वडगाव पाली, 23 जून उदंड वडगाव, 24 जून चौसाळा, 25 जून वाकवड, 26 जूनला भूम, 27 जूनला आष्टा, 28 जूनला वाकडी शेंद्री, 29 जूनला वडसिंगे माढा, 30 जूनला वडाची वाडी आष्टी, 31 जुलैला रोपळे येथे पालखी पोहोचून सायंकाळी संत नामदेव महाराजांची पालखी भेट होईल.