जळगाव। भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्य जयंती निमित्ताने सेंट्रल रेल्वे मजदूर संघ आयोजित सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशनच्या तसेच माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीच्या माध्यमातून जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार सुरेश भोळे, मंडळ अध्यक्ष व्ही. के. समाधीच्या, रुबल पाटील, तोरण सिह, उमाकांत बाविस्कर, कल्पना कुळकर्णी, अंजली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कडकडत्या उन्हात माणुसकीचे दर्शन
उन्हाळ्याचे दिवस असल्याने कॉलेज, शाळा,महाविद्यालयांना सुट्या असतात. यामुळे मोठ्या परमनंट रक्ताचा तुटवडा रक्त पेढ्या मध्ये असतो. एखाद्याला रक्त लागल्याने त्याला भटकंती करावी लागते. याचे भान ठेऊन यावेळी मान्यवरांनी आयोजकांनी एखाद्या संस्थेला रक्तदान शिबिराचे आयोजन करावयाचे असल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी उन्हाची पर्वा न करता रक्तदान केले आहे. यातच जळगाववासियांचे माणुसकीचे दर्शन घडते. अधिकारी, कर्मचारी, महिला, हमाल बांधव, प्रवासी आदींनी भव्य रक्तदान शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे.
शिबिरासाठी परिश्रम
मुक्ती फाउंडेशन, सी,आर,एम.एस पाचोरा, रेल्वे मजदूर संघाच्या आयोजित रक्तदान शिबिरासाठी शाखा अध्यक्ष अनिल सिह, शाखा सचिव गणेश सिह ,कोषाध्यक्ष विश्वास.एम.पाटील, के.एन.कोल्हे, रवीरांजण सिन्हा, एस.पी.जोशी, गोळवलर रक्तपेढीचे पदाधीकारी तसेच मुकिती फाउंडेशन चे अध्यक्ष दिव्यांग विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी आदींनी भव्य रक्तदान शिबीसाठी परिश्रम घेतले.