मुक्ती फाऊंडेशनतर्फे‘नेत्रदान पंधरवाडा’

0

जळगाव । नेत्रदान पंधरवाडा व शासनाच्या अवयवदान जनजागृती कार्यक्रमात सेवाभावी संस्था मुक्ती फाऊंडेशन तथा शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कांताई अत्याधुनिक नेत्रालयातर्फे सहकार्याने विशेष उपक्रम मुक्ताईनगर येथील कुर्‍हा या गावी नुकताच झाला. यावेळी अधिकारी उपस्थित होते.

स्त्री रोग तपासणी कॅन्सरसह अवयवदान जनजागृती
भव्य मोफत आराग्य शिबिराच्या माध्यमाने साधारण 500 रुग्ण, नातेवाईक तथा मान्यवरांचा उपस्थितीत हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, इसीजी मोफत एजोग्राफी किडनी, जनरल तपासणी, स्त्री रोग तपासणी कॅन्सरसह अवयवदान जनजागृती, नेत्र तपासणी कृत्रिम भिंगारोपण मोफत शस्त्रक्रिया व नेत्रदान जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमास कांताई नेत्रालयातर्फे डॉ. भावना अमरनाथ चौधरी तसेच शिवचरण उज्जैनकर, ग्रामस्थ कुर्‍हा, नेत्रालय, फाऊंडेशन आदींचे सहाकर्य लाभले.