मुखवटे आणि खरे चेहरे

0

कठुआ प्रकरण जेव्हा गाजत होते, त्याच काळात भिवंडी येथेही 4 वर्षांच्या हिंदू मुलीची अबिद महंमद अजमीर शेख या धर्मांधाने बलात्कार करून हत्या केली. तिच्या अवयवांचीही विटंबना केली गेली. नुकतेच गोव्यातील बायणा, मुरगाव येथे हबीब नावाच्या एका महिलेने 8 अल्पवयीन मुलींवर अमानुष अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीला आले होते. मात्र, याप्रकरणी पीडितांना न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, म्हणून कुठले निषेध आंदोलन झाल्याचे दिसून आले नाही. केवळ विशिष्ट गटांतील व्यक्तींवर होणार्‍या अन्यायाची प्रकरणे उचलून धरायची. मात्र, त्याच स्वरूपाचा अन्याय अन्य गटांतील लोकांवर आढळून आला, तर मिठाची गुळणी धरायची हा दुटप्पीपणा आहे.
जानेवारीमध्ये कठुआ येथे बालिकेच्या झालेल्या हत्याप्रकरणी 2 आठवड्यांपूर्वी देशात वादळ उठले. कुठल्याही महिलेवर अत्याचार, बलात्कार होणे, तिचे लैंगिक शोषण होणे हे निषेधार्हच आहे. अशा गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी. मात्र, जेव्हा केवळ निवडक घटना उचलून त्याचा बागुलबुवा निर्माण केला जातो, तेव्हा त्यामागे पीडित मुलीप्रतिच्या सहानुभूतीपेक्षाही हिडिस राजकारण दिसून येते.

दुटप्पी भूमिका-कठुआ प्रकरणानंतर देशभर एकच हल्लाबोल केला गेला. या प्रकरणातील तथ्ये समोर येण्याच्या आधीच ‘मंदिरात बलात्कार’, ‘भारतीय बलात्कारी’, ‘भारतात महिला असुरक्षित’ अशा प्रकारच्या पोस्टस् व्हायरल झाल्या. अनेकांनी ‘मी हिंदुस्थानी आहे. मला लाज वाटते. एका देवस्थानात 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला’ असे फलक धरून त्याची छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केली. ठिकठिकाणी मेणबत्ती मोर्चे काढले गेले. मात्र, त्याच काळात अन्य एके ठिकाणी धर्माने हिंदू असलेल्या मुलीवर झालेल्या अत्याचारांप्रकरणी कुणी अवाक्षर काढले नाही. कठुआ प्रकरण जेव्हा गाजत होते, त्याच काळात भिवंडी येथेही 4 वर्षांच्या हिंदू मुलीची अबिद महंमद अजमीर शेख या धर्मांधाने बलात्कार करून हत्या केली. तिच्या अवयवांचीही विटंबना केली गेली. नुकतेच गोव्यातील बायणा, मुरगाव येथे हबीब नावाच्या एका महिलेने 8 अल्पवयीन मुलींवर अमानुष अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीला आले होते. मात्र, याप्रकरणी पीडितांना न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, म्हणून कुठले निषेध आंदोलन झाल्याचे दिसून आले नाही. केवळ विशिष्ट गटांतील व्यक्तींवर होणार्‍या अन्यायाची प्रकरणे उचलून धरायची. मात्र, त्याच स्वरूपाचा अन्याय अन्य गटांतील लोकांवर आढळून आला. दुर्दैवाने अशी दुटप्पी भूमिका देशात अनेक दशके दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय षडयंत्र ‘कठुआप्रकरणी आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांना न्यायालयात उपस्थित केले, तेव्हा त्यांनी ते पूर्णतः निर्दोष असल्याचा दावा करत त्यांची ‘नार्को टेस्ट’ करण्याची आणि या प्रकरणाचे अन्वेषण केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी केली. आरोपी सहसा स्वतःची नार्को टेस्ट करण्याची मागणी करत नाही. मात्र, याप्रकरणी आरोपींनी ती केली. यासंदर्भात आरोपींच्या अधिवक्त्यांनी ‘जम्मू पोलिसांकडे अन्वेषण न सोपवता विशेष अन्वेषण पथकाची स्थापना करून श्रीनगरमधील अधिकार्‍यांना, जे अधिकारी स्वतःच एका गुन्ह्यातील आरोपी आहेत, त्यांच्याकडे या प्रकरणाचे अन्वेषण देण्याविषयी’ प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला असून त्याची एक कहाणीच अन्वेषण अधिकार्‍यांनी सांगितल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे, तर दुसरीकडे तीव्र छळ करून आणि उपाशी ठेवून आरोपींकडून स्टेटमेंटस् घेतली जात असल्याचा आरोप आरोपींच्या अधिवक्त्यांनी केला आहे. याविषयी दाखल केल्या गेलेल्या आरोपपत्रात मुलीवर बलात्कार झाल्याचा उल्लेख नव्हता, असेही पुढे येत आहे तसेच ज्या मंदिरात बलात्कार झाल्याचे सांगण्यात येते, तेथे मंदिर भरवस्तीत आणि खुले असल्याचीही माहिती समोर आली आहे. एकंदरित या सगळ्या प्रकरणातील संशयास्पद जागा पाहिल्या, तर पीडित मुलीचे नाव उघड होणे, प्रसारमाध्यमे, स्त्रीवादी संघटना, कथित बुद्धीवादी वर्ग यांनी व्यापक आवाज उठवणे हा योगायोग नाही हे कुणाच्याही लक्षात येईल. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व अपकीर्त करण्याचेच हे कारस्थान आहे.

डोळस दृष्टी हवी -या दुटप्पी भूमिकेच्या मागे एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्र कार्यरत आहे. देशात मधूनच असहिष्णूतेची लाट उसळल्याचे जाणवणे, अल्पसंख्यांकांचे भवितव्य संकटात असल्याच्या वावड्या उठणे, वृत्तवाहिन्या, प्रसिद्धीमाध्यमे आदी माध्यमातून हिंदुत्व आणि श्रद्धास्थाने यांचे हनन होण्याचा प्रयत्न होणे ही सगळी त्याचीच लक्षणे आहेत. कारण तसे नसते, तर कठुआ प्रकरणी आवाज उठवणारी माध्यमे आणि निषेधकर्ते काश्मिरी हिंदू महिलांवर वर्ष 1990 मध्ये आणि त्यानंतर झालेले अत्याचार, हिंदूंचा झालेला वंशविच्छेद, विज्ञापने-चित्रपट या माध्यमातून हिंदूंच्या देवतांचा केला जाणारा अपमान यांविषयीही बोलते झाले असते; पण तसे होतांना दिसून येत नाही. मानवाधिकारवाल्यांनाही नक्षलवादी, आतंकवादी यांच्या मानवाधिकारांची चिंता वाटते; पण निष्पाप नागरिकांच्या मानवी अधिकारांचे मूल्य वाटत नाही. भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करणे, जाती-धर्माच्या नावावर फूट पाडणे, देशात अस्थिरता निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणे हा देशद्रोही शक्तींचा कट आहे. तो हाणून पाडण्यासाठी देश, धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी भेदभाव विसरून संघटित होणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजात घडणार्या घटनांकडे डोळसपणे पहाण्याची आणि निषेधामागच्या भावना ओळखण्याची सवय लावून घ्यायला हवी. व्यक्ती अथवा संघटना यांच्या भूमिका ‘निवडक’ आहेत की एकसमान आणि तात्त्विक आहेत, हे पाहायला हवे. एकदा त्याचा अभ्यास होऊ लागला की, मुखवटे आणि चेहरे यांतील भेद सहज लक्षात येऊ शकेल.

चेतन राजहंस,
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387