मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

0

बोदवड। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेगावकर हे बोदवड पंचायत समितीमध्ये आढावा बैठकीसाठी आले असता, सभापती गणेश पाटील यांनी तालुक्यातील पाणी टंचाईची समस्या मांडली मात्र दिवेगावकर यांनी यावर लक्ष न देता उलट सभापतींशी उर्मट वागणूक करीत त्यांना बाहेर जाण्यास सांगितल्याने त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी सभापती गणेश पाटील व कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

पाणी टंचाईच्या समस्येकडे केले दुर्लक्ष
तालुक्यात पावसाची हजेरी न झाल्यामुळे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. यासंदर्भात टंचाईग्रस्त गावातील सरपंचांनी सभापती गणेश पाटील यांना तक्रारी केल्या आहे. 23 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेगावकर हे बोदवड पंचायत समितीच्या कर्मचार्‍यांची बैठक घेण्यासाठी आले असता सभापती गणेश पाटील यांनी दिवेगांवकर यांच्याकडे पाणी टंचाईबाबत समस्या मांडली असता त्यांनी सभापतींशी उर्मटपणे वागणूक करीत बाहेर काढले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर कारवाईच्या मागणीसाठी सभापती पाटील यांसह कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात नगरपंचायत गटनेता कैलास चौधरी, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पाटील, जिल्हा परिषद सदस्य भानुदास गुरचळ, उपसभापती दिलीप राणे, पंचायत समिती सदस्य किशोर गायकवाड, प्रतिभा टिकारे, अनिल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, चिचखेडा सरपंच प्रकाश पाटील, नगरसेवक दिनेश माळी, उपसरपंच निलेश माळी, उदय कोकाटे, हरणखेड सरपंच सुनिता गांधी, रुपेश गांदी, राकेश बोरसे, सईद बागवान, निवृत्ती पाटील, मधुकर राणे, रामदास पाटील, विजय चव्हाण, सुरेश बिजागरे, भास्कर पाटील, किरण वंजारी, दिलीप घुले, सुधीर पाटील, विनोद कोळी, सोपान इंगळे, सुभाष इंगळे आदींनी सहभाग घेतला.