मुख्यमंत्रीपदी फडणवीस पुन्हा विराजमान; जळगावात भाजपचे जल्लोष !

0

जळगाव: राजकारणातील सर्वात अनपेक्षित घटना आज सकाळी घडली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काही गट फुटून भाजपला पाठींबा दिल्याने पुन्हा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहे. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. भाजपसाठी ही सर्वात आनंदाची बाब असल्याने जळगावात भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकच जल्लोष केला. महानगर पालिका आणि भाजप कार्यालयासमोर भाजपने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला.

यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, स्थायी समिती सभापती शुचिता हाडा यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.