तळोदा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून सुखरुप बचावल्याने, तळोदा येथे काल आमदार उदेसिंग पाडवी व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी यांचा प्रमुख उपस्थितीत हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जागृत देवस्थान असलेल्या रोकडमल हनुमान मंदिरात काल सायंकाळी हनुमान चालिसा पठणाचा अभिषेकचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी धार्मिक पूजाविधी करण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांचा उदंड आयुष्यांसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, शहर अध्यक्ष हेमलाल मगरे, नगरसेवक विवेक चौधरी, भाजपा दलित आघाडीचे डॉ. स्वप्नील बैसाणे, नितीन पाडवी, संजय चौधरी, शिरीष माळी, जगदीश परदेशी, भास्कर मराठे, प्रसाद बैकर तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.