मुख्यमंत्री अशोक गेहलोत राज्यपालांच्या भेटीला; मंत्रिमंडळात फेरबदलाची देणार माहिती

0

जयपूर: कॉंग्रेस नेते उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड केले होते. त्यामुळे राजस्थानच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सचिन पायलट यांना समर्थक आमदारांसह परत येण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. मात्र सचिन पायलट हे परतले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडील उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात आले आहे. त्यांच्यासहित दोन मंत्र्यांवरही कारवाई करण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत राज्यपालांच्या भेटीला गेले असून ते या कारवाईबाबत माहिती देणार आहे.

सचिन पायलट यांच्यासह मंत्री विश्वेंद्र सिंह, रमेश मीना यांच्याकडील मंत्रीपद काढून घेण्यात आल्याची  माहिती ते राज्यपालांना देणार आहे.