मुंबई: राज्याचा पुराने थैमान घातले आहे. अजूनही परिस्थिती पूर्ववत झालेली नाही. सांगली, कोल्हापूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे सर्वाधिक नुकसान झाले आहे. दरम्यान संपूर्ण राज्य भारातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु आहे. आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांनी एका महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देऊ केला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीत ही रक्कम जमा होणार आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्हा दुध उत्पादन संघाने देखील २५ लाखांची भरघोस रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे.