मुंबई: भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषद (एमएलसी) निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र या निवडणुकांदरम्यान कोरोनाचा विचार करता सुरक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या या जागा गेल्या २४ एप्रिलपासून रिक्त आहेत. निवडणूक आयोगाने या जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घ्यावी आणि राज्यात निर्माण झालेला मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवावा, अशी विनंती राज्यपाल कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या जागांची निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यास परवानगी दिल्याने उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना दिलासा मिळाला आहे