मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

0

मुंबई – विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद या सभागृहाचा सभासद म्हणून निवडून येणे आवश्यक होते.