नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीची धूमधाम सुरु आहे. राजकी नेतेमंडळी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करत आहे. अनेकदा भावनिक आवाहनही नेते करतात. दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी हे मतदारांसमोर भाषण करताना भावूक होऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माध्यमांकडून प्रत्येक दिवशी आजचा दिवस माझा शेवटचा दिवस आहे असा प्रचार होऊ लागला या उल्लेखाने व्यासपीठावर कुमारस्वामींना रडू कोसळले.
कर्नाटकातीलमंड्या येथील जाहीर सभेत बोलताना कुमारस्वामी भावूक झाले. माझा मुख्यमंत्रीपदाचा शेवटचा दिवस आहे. माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत अशाप्रकारे प्रचार विरोधकांकडून केला जातो आहे, असा आरोप त्यांनी केला. मंड्या लोकसभा मतदारसंघातून एच डी कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखील कुमारस्वामी निवडणूक लढवत आहेत. यामुळेच जेडीएस सर्व ताकदीने या मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. याआधीही कुमारस्वामी अनेकदा मतदारांसमोर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीचे कुमारस्वामी यांचे वडील आणि माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांनाही माध्यमासमोर रडू कोसळले होते.