चंदिगड । हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पंचकुलामध्ये झालेल्या हिंसेचे खापर पंजाबवर फोडले आहे. बलात्कारातील दोषी निश्चित झाल्यानंतर राम रहीमला पंचकुला कोर्टातून पळवून नेण्याचा पंजाब पोलिसांचा मोठा कट असल्याचा गौप्यस्फोटदेखील त्यांनी केला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या
मुलाखतीत मनोहरलाल खट्टर म्हणाले की, बाबाच्या सुरक्षेत तैनात असणारे 8 कमांडो पंजाब पोलिसांचे होते. त्यांनी बाबाला पळून जाण्याचा कट रचला होता. परंतु आमचे पोलिस, पॅरामिलिटरी फोर्सने त्यांचा कट उधळला. खट्टर पुढे म्हणाले, राम रहीमच्या डेर्यात 1 लाख लोक थांबू शकतील अशी व्यवस्था आहे. जर बाबा कोर्टात आला नसता तर किती नुकसान झाले असते याचा आम्ही अंदाज बांधला होता.