रावेर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शासकीय शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना कार्यालयात थांबणे आवश्यक होते. मात्र चित्र वेगळेच दिसत आहे. मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर असताना रावेर तालुक्यातील प्रमुख कार्यालयातून शासकीय अधिकारी व कर्मचारी गायब असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री शेजारील मुक्ताईनगर तालुक्यात आहे याचे भान शासकीय कर्मचाऱ्यांना नसल्याचे दिसते. पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारन विभाग, कृषी विभाग, एकात्मक बालविकास विभाग, गट शिक्षण विभाग, आदी कार्यालयांमध्ये जाऊन दैनिक जनशक्तीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, कार्यालयात सन्नाटा असल्याचे दिसून आले. दुसरीकडे महसूल विभाग, पोलिस प्रशासन, वन विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कर्मचारी अधिकारी कार्यालयात होते.
राज्य शासनाने नुकतेच शासकीय कर्मचा-यांसाठी पाच दिवसाचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह डझनभर मंत्री जिल्हात असताना शासकीय अधिकारी, कर्मचारी बिनधास्त कार्यालयातून गायब आहेत.