पिंपरी : दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याचा 37 वा गळीत हंगामाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणात नाभिक समाजाबद्दल अनुद्गार काढले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे नाभिक समाज समस्त महाराष्ट्र राज्याच्या उपहासाचा आणि निंदेचा विषय बनला आहे. यामुळे भावना दुखावल्या गेल्या आहेत.
याबद्दल त्यांंनी आमची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने करत सोमवारी पिंपरी येथे आंबेडकर चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत चव्हाण, महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूराव काशीद, प्रदेश अध्यक्ष कल्याणराव दळे, रामदास सूर्यवंशी, रमेश राऊत, प्रदीप वाळुंजकर, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा शाखेचे अध्यक्ष अशोक मगर आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.