भोपाळ-मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत १५ वर्षापासून असलेली भाजपची सत्ता गेली आहे. शिवराजसिंह चौहान यांनी आपला राजीनामा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. १३ वर्ष मला मध्य प्रदेशच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. जनतेचा प्रेम नेहमी मिळाले आहे. मी एक मुख्यमंत्री म्हणून नाही तर परिवारातील सदस्य म्हणून जनतेची सेवा केलेली आहे असे शिवराजसिंह यांनी सांगितले आहे.
मध्य प्रदेशचे ७.५ कोटी जनता माझ्या परिवारातील सदस्य होती. त्यांचे सुख, दु:ख माझे होते. जनतेच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारची कसर मी सोडलेली नाही असे शिवराजसिंह चौहान म्हणाले.