मुख्यमंत्री निधीतून पथदिवे, दवाखाना सक्षमीकरण करा

0

जळगाव। शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी 25 कोटीचा निधी मंजूर केला आहे. या निधींतून कोणती कामे करावीत यासाठी सत्ताधारी व विरोधक भाजपामध्ये रस्सीखेच सुरू असून श्रेयघेण्यावरून वाद होत आहे. या वादात न पडाता माजी उपमहापौर व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी स्काडा पाणीपुरवठा योजना, एलईडी पथदिवे व दवाखान्यांचे सक्षमीकरणासाठी आज शुक्रवारी पत्रकारपरिषदेत विकासाचा अ‍ॅक्शन प्लॉनच सादर केला आहे. या 25 कोटीतून कोणा एका नगरसेवकाच्या वार्डाचे नव्हे संपूर्ण शहराचाच विकास करा, असे आवाहन त्यांनी सत्ताधारी व विरोधकांना केले.

शहराच्या विकासासाठी 25 कोटी
पत्रकार परिषदेत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी त्यांच्या अक्शन प्लॉनची विस्तृत माहीती दिली. 25 कोटीच्या कामांची जी यादी मंजूरीसाठी देण्यात आली आहे. त्या यादीत केवळ रस्ते व गटारींचीच कामे घेतली आहे. त्यातील अनेक कामे आवश्यक देखील नाहीत त्यामुळे पाणी,पथदिवे व दवाखाने सक्षमीकरणाच्या अत्यावश्यक कामांसाठी यातील 8 ते 10 कोटी रुपयांची रक्कम खर्च करावी असे त्यांनी सांगीतले. महापालिकेच्या वाघुर पाणीपुरवठा याजनेतून दररोज 100 एमएलडी पाणी सोडले जाते. यातील 45 एमएलडी पाणी नियोजनाअभावी व गळत्यांमुळे वाया जाते. मात्र यासाठी आवश्यक असलेली स्काडा सिस्टीम बसविल्यास पाणीपुरवठ्याची स्वंयचलित यंत्रणा राहील. त्यामुळे वाया जाणारे 45 एमएलडी पाणी वाचेल. तसेच जळगावकरांना दररोज पुरेसे पाणी मिळेल असे त्यांनी सांगीतले.

विविध ठिकाणी होणार सुखसुविधा
शहरात सध्या असलेल्या वेगवेगळ्या वॅटच्या पथदिव्यांमुळे महिन्याला लाखो रुपयांचे बिल येते. या ठिकाणी जर एलईडी दिवे बसविल्यास दरमहा 10 लाख रुपयांची बचत होणार असल्याचे कैलास सोनवणे यांनी सांगीतले. विशेष म्हणजे हे दिवे सेन्सरमुळे सुर्यप्रकाश येताच बंद होतील. मुंबईचे अभियंता सुभाष देशपांडे, जळगावतील एसएसबीटी अभियांत्रिकीचे प्रा. संजय शेखावत व प्राज्ताहिद अंसारी या तज्ञांनी याचा प्लान तयार करुन दिला आहे. जळगावतील दवाखान्यांची दुरावस्था झाली आहे. या दवाखान्यांसाठी एक्स रे मशिन, सोनोग्राफी मशिन, सिटी स्कॅन, तिन नग इनक्युबेटर्स, बायल ऑपरेटस,औषध स्टोअरेजसाठी तिन फ्रिजची आवश्यकता आहे. सार्वजनिक शौचालये, शाळांची दुरुस्ती, कुत्रांचे निर्बिजीकरण ही कामेही करावीत. असेही सोनवणे यांनी सांगीतले. हा अक्शन प्लॉन ज्यांच्यामुळे निधी मिळाला ते जलसंपदमंत्र गिरिष महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर नितिन लढ्ढा व आमदार सुरेश भोळे यांना देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.