मुख्यमंत्री पेयजलच्या कामांचे भूमिपूजन

0

शिरपुर । तालुक्यातील फत्तेपूर व चांदसे येथे मुख्यमंत्री पेयजलच्या कामाचे भूमिपूजन, फत्तेपूर येथील 11 पाड्यांवर विद्युत ट्रान्सफार्मरचे लोकार्पण, बोराडी येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 260 महिलांना गॅसचे वितरण, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 100 लाभार्थींना धनादेश वाटप खासदार डॉ.हिना गावीत यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वसावे, शशांक रंधे, बीपीसीएल कंपनीचे सेल्स अधिकारी होते. कार्यक्रमाचे आयोजन सरपंच रतन पावरा, विजय शिंदे, ज्योतीबाई तडवी, पं.स.सदस्य दिलीप तडवी यांनी केले. ग्रामस्थांनी खा.डॉ हिना गावित यांचे स्वागत पारंपारिक ढोल वाजवून व फटाक्यांच्या आतिशबाजीने केले.

20 गावांचा समावेश
खा.डॉ.हिना गावीत यांनी पारंपारिक आदिवासी भाषेत जनतेशी सवांद साधला. शिरपुर तालुक्यातील पाण्याची भीषण टंचाई बघता तालुक्याच्या आढावा घेऊन सर्व गावांचा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांकडे मांडला असून यावर विचार करून तालुक्यातील 12 गावांना मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये घेण्यात आले असून 8 गावे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत समाविष्ट केल्याचे सांगितले.

रस्त्याचे काम व्हावे
नागरिकांच्या पाण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी खासदार डॉ.गावित यांनी विशेष प्रयत्न केल्याने त्याचा आभार तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी मानले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 20 गावांचा पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट केले. फत्तेपूर ते चान्दसुर्या रस्ता अतिशय खराब झाला आहे तो तयार करण्यात यावा, चांदसे-वासर्डी या शिवारातील धरणाचे पाणी शेतीस मिळावे याकरिता सुविधा कारावी, या भागातील बर्‍याच पाटचार्‍यात गाळ असल्याने ते काढण्यात येऊन त्यांचे खोलीकरण करावे अशी अपेक्षा रंधे यांनी व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी सुक्राम पावरा, जाड्या पावरा, दशरथ पावरा, दिपाली ईशी, आनाद्सिंग भंडारी, ग्यानसिंग पावरा, जामबाई पावरा, विठ्ठल चौधरी, तात्या पावरा, रूपसिंग पाटील, रुमाल पावरा, मास्तर पावरा, शिलदार पाडवी, मदन पावरा, कलार्‍या पावरा, जमादार पावरा, प्रवीण पावरा, छगन पावरा, शिलदार पावरा, नवलसिंग पावरा, खुमारसिंग पावरा, सुतार्‍या पावरा, दरबारसिंग गिरासे, जितेंद्र पाटील, भारत पावरा, बाबा चौधरी, रामदास पाटील, निलेश महाजन, सुभाष राजपूत यांची उपस्थिती होती.