मुख्यमंत्री येत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार नाही; उन्नाव पीडितेच्या कुटुंबीयांची भूमिका !

0

लखनऊः उन्नाव बलात्कार पिडीतेला जाळून टाकण्यात आले होते. अखेर पिडीतेने काल अखेरचे श्वास घेतले. दरम्यान आज रविवारी पीडितेचे पार्थिव दिल्लीहून गावात पोहोचले आहे. जोपर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत नाहीत तोपर्यंत पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, अशी भूमिका पीडितेच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.

उन्नाव बलात्कार पीडितेच्या निधनानंतर योगी सरकारने पीडितेच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. परंतु, तरीही पीडितेचे कुटुंब त्यांच्या भेटीसाठी अडून बसले आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार नाहीत तोपर्यंत पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत, अशी ठाम भूमिका पीडितेच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. बलात्कार पीडितेचे पार्थिव शनिवारी रात्री उन्नाव येथे पोहोचले. पीडितेचे पार्थिव जाळण्यात येणार नाही तर त्याचे दफनविधी केला जाईल, असे कुटुंबीयांनी सांगितले. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अडून बसलेल्या कुटुंबीयाच्य भूमिकेमुळे अंत्यसंस्काराला उशीर होण्याची शक्यता आहे.