अंबेजोगाई: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ काही तासच शिल्लक राहिले आहे. उद्या संध्याकाळी प्रचार तोफा थंडावणार आहे. तत्पूर्वी प्रचार सभेचा धडाका वाढला आहे. आज बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची प्रचारसभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि भाजपला लक्ष केले.
मुख्यमंत्री हे आमच्यासमोर निवडणुकीच्या आखाड्यात खेळायला पहेलवानच नाही असे म्हणतात, मात्र आमच्याशी कुस्ती खेळण्याची कुमक भाजपात नाही असा टोला शरद पवारांनी लगावला. पूर्वी जत्रेच्या निमित्ताने गावागावात कुस्ती स्पर्धा व्हायची, कुस्तीला मोठ-मोठे पहेलवान यायचे, सुरुवात मात्र लहान मुलांच्या कुस्तीने व्हायची. ती कुस्ती खायच्या ‘रेवडी’वर व्हायची. मुख्यमंत्री देखील रेवडीवर कुस्ती खेळणारे पहेलवान असून त्यांच्यात आमच्याशी कुस्ती खेळण्याची कुवत नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला.
जर मुख्यमंत्र्यांना या निवडणुकीत रस वाटत नसेल तर मोदी, शहा सारखे नेते कशाला निवडणुकीच्या जत्र्यात फिरत आहे असा टोलाही शरद पवारांनी लगावला.