मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री 20 रोजी मुक्ताईनगरात

Birthday celebrations of MLAs will be celebrated: Chief Minister and Deputy Chief Minister on 20th in Muktainagar मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अभिष्टचिंतनपर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, 20 सप्टेंबर रोजी मुक्ताईनगरात येत आहेत. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा बुधवार, 14 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. यंदा वाढदिवसाला अतिशय जंगी पध्दतीत साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवार, 14 रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा नियोजीत कार्यक्रम असल्याने हा कार्यक्रम 20 सप्टेंबर रोजी घेण्यात येत आहे.

क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणार कार्यक्रम
शहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर भव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांची उपस्थिती असेल. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रीत करण्यात येणार आहे. या माध्यमातून आमदार चंद्रकांत पाटील हे मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहेत.

आमदारांनी केली मैदानाची पाहणी
दरम्यान, शुक्रवारी व शनिवारी आमदार पाटील यांनी अधिकारी व सहकार्‍यांसह या मैदानाची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या सोबत छोटू भोई, अफसर खान, राजेंद्र हिवराळे, पंकज राणे, गोपाळ सोनवणे, संतोष मराठे, मुकेश वानखेडे, गणेश टोंगे , स्विय सहायक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील, तुषार बोरसे, निलेश शिरसाठ, आरीफ आझाद, शुभम शर्मा, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता आय बी शेख आदींची उपस्थिती होती.

प्रथमच मुख्यमंत्री मुक्ताईनगरात
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा मुक्ताईनगर शहरांमध्ये येत आहे. मुख्यमंत्री दौर्‍यात काय घोषणा करतात तसेच विधान परीषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परीषदेचे आमदार झाल्यानंतर विधान परीषदेत केलेल्या भाषणाच्या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे काय बोलतात ? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.