मुख्यमंत्री व वनमंत्र्यांच्या उपस्थितीत 1 ऑक्टोबर रोजी जळगावात बांबू शेती कार्यशाळा

0

जळगाव – राष्ट्रीय बांबू अभियानातंर्गत ग्रामीण भागात बांबू शेतीला प्रोत्साहन मिळून खाजगी जमिनीवर बांबू लागवड वाढावी. यासाठी जळगाव येथे १ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, नॅशनल बांबू मिशन कार्यकारी समितीचे अध्यक्ष एम. के. अण्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बांबू शेती कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.

बांबू शेती कार्यशाळेच्या पूर्वतयारीकरीता येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात नॅशनल बांबू मिशन कार्यकारी समितीचे अध्यक्ष एम.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक टी. एस. के. रेड्डी, मुख्य वनसंरक्षक (प्रा) धुळेचे टी. एन. साळुंखे, इंडियन फेडरेशन ॲन्ड ग्रीन एनर्जीचे संचालक संदिप ढेंग, जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, उप वनसंरक्षक यावलचे प्रकाश मोराणकर,उप वनसंरक्षक नाशिक श्री. शिवबाला, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, विभागीय वन अधिकारी बी. एच. पाटील,  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.