नवी दिल्ली। आज मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे निर्वाचित मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ, राजस्थानमध्ये अशोक गेहलोत तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून विरोधकांचा भाजपला एकजुटीचा प्रत्यक्ष दाखविण्याचा प्रयत्न आहे. मात्र या शपथविधीला समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, बसपा प्रमुख मायावती अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून भाजप विरोधात तयार होत असलेल्या महाआघाडीत आलबेल नसल्याचे दिसून येते.
कॉंग्रेसला छत्तीसगड वगळता इतर कोणत्याही राज्यात स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे सपा बसपाने पाठिंबा दिला आहे. मात्र पाठिंब्याच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला ही नेते मंडळी उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात आहे.