मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची कोरोनावर मात; दुसरा रिपोर्ट आला

0

भोपाळ: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली होती. २५ जुलैला त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तेंव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान त्यांच्यावरील उपचार पूर्ण झाले असून त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांचा आज मंगळवार ११ ऑगस्टला दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात ते निगेटिव्ह आले आहेत. याबाबत त्यांनी स्वत:हून ट्वीटकरून माहिती दिली आहे.

२५ जुलैपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही दिवस ते रुग्णालयात देखील होते. मात्र त्यानंतर ते घरीच आयसोलेट झाले, घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाने भारतात थैमान घातला आहे. देशातील रुग्ण संख्या २२ लाखांच्या पुढे गेली आहे.सामान्य नागरिकांपासून राजकीय नेते, बॉलीवूडमधील दिग्गज नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.