मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना मदत

0

शिरपूर । शिंदखेडा तालुक्यातील विविध अपघातात मृत्यू पावलेल्या 11 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 1 लाख रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य करण्यात आले. यासाठी माजी आमदार रामकृष्ण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदिप बेडसे यांनी प्रयत्न केले. या दोघा नेत्यांनी गरजूंना तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी संदिप बेडले होते. माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी आतापर्यंत 75 पेक्षा जास्त मृत्यूमुखी पडलेल्यांना तसेच अवघड शस्त्रक्रीयेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच विविध ट्रस्टमार्फेत आर्थिक मदत देण्यात येते. अशा गरजूंना 50 हजार ते 2 लाख रूपयांपर्यंतची मदत मिळू शकते. याप्रसंगी माजी सरपंच डिंगबर पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य मोतीलाल पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, चेतन पाटील, भूषण भदवे, लाभार्थ्यांचे नातेवाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा. सी. डी. डागा यांनी मानले.

लाभार्थी: समाधान कृष्णा बागल(निमगुळ) , जगन दौलत रामराजे(शमी), धनराज हिंमत पवार (नेवाडे), हिरामण रामदास कोळी(परसामल), लालसिंग गिरासे(अमळथे), ज्ञानेश्वर गिरासे(जसाणे), छगप दगा पवार(वाघाडी), वैशाली रामकृष्ण पाटील(सरवड), एकनाथ विश्‍वास पाटील(धमाणे), नथेसिंग विठ्ठलसिंग गिरासे(धोदणे), संपतसिंग विठ्ठलसिंग गिरासे(धांदरणे)